टीप: या संदर्भात अधिक माहिती आता प्रकाशात आली आहे. काही साईट्स वर दिलेल्या माहिती नुसार, बेस्ट खाजगी लोकांना गाडी चालवण्याचे ट्रेनिंग देते. या मुलीने बेस्ट कडून बस चालवायचे ट्रेनिंग घेतले आहे. तिचा अजून तरी बेस्ट मध्ये नोकरी करण्याचा विचार नाही. खालील आर्टिकल मध्ये तिला R T O मध्ये नोकरी करायची आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.
आपल्या समाजात पुरुषी मानसिकता खूप खोलवर रूजली आहे. अजूनही मुलींवर बरीच बंधने बघायला मिळत असतात. त्यातल्या त्यात 'ड्रायव्हिंग म्हणजे फक्त पोरांची मक्तेदारी आहे बॉस!' याप्रकारचा ऍटीट्यूड पाहायला मिळतो. पण आता जमाना बदलत आहे राव!! 'मारी छोरीयाँ छोरों से कम है कै?' हा दंगलमधला डायलॉग पोरी सगळ्याच क्षेत्रात खरा करून दाखवत आहेत. आता हळूहळू मुलीसुद्धा ड्रायव्हिंग करायला लागल्या आहेत. ते ही साध्यासुध्या नाही, तर मोठमोठ्या गाड्या!!
मंडळी, एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून लेडीज कंडक्टर दिसायला लागल्या आहेत. पण ड्रायव्हर अजूनही पुरुषच दिसतात. रात्री अपरात्री गाडी चालवावी लागते. म्हणून मुलींनी बस, ट्रक यांच्यासारख्या गाड्या चालवायला नको असा एक समज आजूबाजूला दिसतो. पण समाजाला फाट्यावर मारत एका मुलीने लय मोठा पराक्रम केला आहे राव!!


