दिल्लीच्या 'काळ्या जलेबी' बद्दल ऐकलंत का ? जाणून घ्या या अनोख्या जिलबी बद्दल !!

दिल्लीच्या 'काळ्या जलेबी' बद्दल ऐकलंत का ? जाणून घ्या या अनोख्या जिलबी बद्दल !!

बिर्यानी, कबाब, मुघलई प्रकारातील खानपान हे दिल्लीची ओळख आहेत. पण या पदार्थांबरोबर एक नवीन पदार्थ सध्या दिल्लीत गाजत आहे, तो पदार्थ म्हणजे ‘काळी जलेबी’. चला आज जाणून घेऊया, काय आहे ही काळी जलेबी आणि या जलेबीत एवढं खास काय आहे?

दिल्लीच्या ‘मटिया महल बाजार’ भागातील ‘सुल्तानजी स्वीट्स अँड स्नॅक्स’ या दुकानात मिळणारी ही अनोखी जलेबी दिल्लीत प्रसिद्ध झाली आहे. ही जलेबी दिल्लीत मिळत असली तरी ती आहे मुळची मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूरची.

स्रोत

काळी जलेबी बनवण्याची प्रक्रिया नेहमीच्या जलेबी सारखीच असली तरी ही जलेबी बनवण्यासाठी  मैदा न वापरता खवा वापरला जातो. खव्यामुळे जलेबी तळल्यानंतर तिचा रंग बदामी काळा होतो आणि जलेबीला गुलाबजाम सारखा स्वाद देखील येतो. एकप्रकारे काळी जलेबी म्हणजे जलेबी आणि गुलाबजामचं मिश्रण आहे राव !!

तर मंडळी कधी दिल्लीला गेलात तर या मस्त आणि वेगळ्या जलेबीचा आस्वाद घ्यायला विसरू नका...