लहानपणी चिखलात लोळलो की आई धुलाई करताना हमखास शिव्या देताना म्हणायची ‘काय डुकरावानी लोळून आलाय’!!. त्या उद्धाराने आपल्याला एक चांगली सवय लावली, ती म्हणजे कपडे नेहमी स्वच्छ असावेत, नेटनेटकेपणा ठेवावा आणि ‘दाग बिलकुल अच्छे नाही है’ बरं का!
पण...पण....पण...या सर्व अंधश्रद्धा आहेत मंडळी. गुडघ्या पर्यंत फाटलेली जीन्स, चिंध्या झालेली पँट असले ‘रॉयल’ कपडे आता फॅशन म्हणून तेजीत आहेत आणि आता तर त्याहीपेक्षा वरचढ गोष्ट आली आहे पण प्लीज फक्त आईला सांगू नका हा !
तर ती नवीन फॅशन म्हणजे चिखलाने भरलेले ‘मड जीन्स’. तुम्ही बरोबर वाचलंत मंडळी. घाबरू नका तुम्हाला चष्मा लागलेला नाहीये....!!!
मड जीन्स हा प्रकार म्हणजे आपण एखाद्या चिखलात घसरून पडलो कि आपली जीन्स कशी दिसेल तशीच. आता तुम्ही म्हणाल ही असली फालतूगिरी कशाला? त्या पाठचं लॉजिक असं आहे कीआपण किती मेहनती आहोत आणि किती काम करतो, घाम गाळतो हे दिसावं म्हणून केलेला हा प्रकार. म्हणजे मड जीन्स विकणाऱ्या साईटवर तरी असंच सांगतं बुवा.
तुमच्या मनात येईल की ‘चायला ५०० ते ८०० पर्यंत मिळतील असली जीन्स...चिखलात रगडून तर देणार आहेत’. पण याची खरी किंमत वाचून तुम्हाला चक्कर येईल मित्रों. मड जीन्ससाठी तुम्हाला ४२५ डॉलर मोजावे लागणार आहेत म्हणजे तब्बल २५ ते २७ हजार रुपये.
काय, मग दिवसा तारे दिसले ना ?
आता काही वाचकांना जर असल्या फॅशनची आवड असेल तर तुम्ही nordstrom.com या वेबसाईटवर जाऊन ही जीन्स ऑर्डर करू शकता पण त्या नंतर जर घरच्यांनी तुमच्यावर शिव्यांची बरसात केली तर आम्हाला बोलायचं नाय हा...भार्चूक नो ! आधीच सांगतो !!!
एक शिक्रेट सांगतो मंडळी. हा धंदा तुम्ही पण करू शकता. आपल्या जुन्या जीन्स चिखलात टाकायच्या आणि विकायच्या कोणाच्या ‘बा’ ला कळणार आहे ? काय बरोबर ना ?


