मुंबईकरांनो गेले अनेक वर्ष आपण एसी लोकल येणार येणार ही नुसती चर्चा ऐकतोय. दरवेळेस या लोकलच्या येण्यात नवनवी विघ्नं येत आहेत. कधी आपल्या जुन्या रेल्वे ब्रिजेस समोर या ट्रेनची उंची जास्त होते तर कधी अजून काही टेक्निकल इश्यूज. तर सध्या म्हणे या लोकल ट्रेनच्या ट्रायल्स चालू आहेत आणि आम्ही आज एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. हा व्हिडीओ साधारण महिनाभरापूर्वीचा आहे.
तर अशी ही आपली एसी लोकल सप्टेंबरमध्ये वेस्टर्न लाईनवर धावणार आहे. तोवर साऱ्या टेक्निकल अडचणी जरी सुटल्या तरी आपल्या मुंबईतली गर्दी पाहता या लोकल्सची दारं बंद होऊ शकतील का?
नाहीतर जपानमध्ये लोकलच्या आत लोकांना ढकलायला खास लोक ठेवले आहेत तसं आपल्याकडे पण करायला लागेल..
