इथे मिळणार आहे फ्री पिझ्झा....तारीख आणि वेळ बघून घ्या राव !!!

इथे मिळणार आहे फ्री पिझ्झा....तारीख आणि वेळ बघून घ्या राव !!!

पिझ्झा फ्री मिळतोय ? पिझ्झा  फ्री मिळतोय ? पिझ्झा फ्री मिळतोय ?


स्रोत

अरे, हो बाबा हो!!! खरच पिज्जा फ्री मिळतोय. काय आहे ना राव, जिओ आल्यापासून फ्री म्हटलं कि आपले कान टवकारतात.

तर मंडळी, बातमी अशी आहे की ‘१४४१ पिझ्झेरिया’ या पिझ्झासाठी प्रसिद्ध असलेल्या शॉपने आपल्या दोन नव्या शाखा उघडायचं ठरवलं आहे. त्यापैकी एक असेल लोअर परळमध्ये आणि दुसरी असेल मालाडमध्ये.


स्रोत

कमला मिल्स, लोअर परळ येथे ३ नोव्हेंबर पासून पिझ्झेरिया सुरु होणार आहे आणि यासाठी धमाकेदार ऑफर म्हणजे संध्याकाळी ५ नंतर पिझ्झा अगदी मोफत !! मोफत!! मोफत!!

अशाच प्रकारे ८ नोव्हेंबर रोजी ‘एवरशाईन नगर’, मालाडमध्ये सुद्धा नव्या दुकानाचं उद्घाटन होईल आणि तिथे सुद्धा पिझ्झा फ्री मिळणार आहे राव !!!


स्रोत

आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ना? थोडं थांबा, आणखी एक गम्मत आहे. ‘१४४१ पिझ्झेरिया’ आपल्याला चक्क त्यांच्या दुकानात पिझ्झा बनवण्याची संधी देणार आहे. आठवड्यातून एकदा, दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत आपण आपला पिझ्झा  तयार करून तो पिझ्झेरिया मध्ये विकू शकतो. एका दिवसाचा ‘शेफ’ बनण्याची संधी मिळतेय भाऊ !!!

आहे कि नाही भन्नाट??