दरवर्षी दिवाळीला एक फोटो व्हायरल होत असतो. या फोटोत दिवाळीच्या रात्री भारत कसा झगमगतो हे दाखवलेलं असतं. हा फोटो गेली बरीच वर्षे व्हायरल होतो आहे. व्हायरल होण्याचं एक कारण म्हणजे हा फोटो खुद्द नासाने प्रसिद्ध केला आहे असा दावा केला जातो. नासाने असा फोटो खरंच शेअर केला आहे का? नासा असे फोटो शेअर करते का?
तर सत्य हे आहे की, तो फोटो एडिट केलेला आहे. २००३ मध्ये नॅशनल ओसनिक अँड एटमॉस्फेरिक या ॲडमिनिस्ट्रेशनने काढलेले अनेक सॅटेलाईट फोटो एकत्र करून तो फोटो वायरल केला गेला. आज हा फोटो इंटरनेटवर फिरणाऱ्या सर्वात प्रसिद्ध फेक फोटोंमध्ये जाऊन बसलाय.

