कोरोना येऊन वर्ष होण्यात आले. या काळात आपण मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्डचे अनेक प्रकार येऊन गेले. त्यांच्यासोबत अनेक प्रयोग होताना देखील आपण बघितले. आता जपानच्या एका व्यक्तीने बनवलेला मास्क मात्र आजवरचा सर्वात वेगळा प्रयोग आहे.
त्याचे नाव आहे, shuhei okawara!! हे नाव मराठीत कसे उच्चारायचे हे कळत नसल्याने जसेच्या तसे लिहावे लागले आहे. याने थेट हायपररिअॅलिस्टिक 3D मास्क बनवला. हा मास्क कसा दिसतो याचा एक नमुना खाली पाहा.







