राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक - Nifty- गेले काही दिवस वर वर जात होता.
काल अचानक हा निर्देशांक खाली घसरला. तेजी संपत आली की काय या शंकेने गूंतवणूकदार पुन्हा घाबरले. पण आज " बिग बुल " राकेश झुनझुनवाला यांनी भरोसा दिला आहे की
येत्या चार पाच वर्षात निफ्टी डबल धमाका करणार अशी शक्यता आहे.
बघू या काय म्हणतात राकेश झुनझुनवाला !!
१ बाजार धावपटू सारखा असतो. त्याला अधून मधून विश्रांतीची गरक असते. तेजीच्या बाजारात वेग वाढला की बाजार पडताना अल्पकाळासाठी जोरात पडतो आणि लगेच नव्या जोमाने धावायला सुरुवात होते.
२ निफ्टीचा ७८०० ते ९५०० हा प्रवास हा तेजीचा पहीला टप्पा होता . आता कदाचित बाजार अधून मधून पडेलही , पण सतत काही दिवस पडले तरच काळजी करावी.
३ प्रधान मंत्री मोदींनी ज्या योजना आखल्या आहेत त्याचे परीणाम दिसण्यासाठी दोन वर्षे जावी लागतील. सध्याचा विकास दर कदाचित १० ते ११ टक्क्यापर्यंत जाईल.
४ मोदी आता बराच पैसा राज्यांकडे सोपवण्याची तयारी करत आहेत. सोबत आर्थिक शिस्त पण लावत आहेत. विकास कामांसाठी मोठे भांडवलही खर्ची लागणार आहे. या सोबत व्याजाचा दर स्थिर आहे आणि रुपयाची आंतराष्ट्रीय बाजारात पत वाढली आहे.
५ निश्चलनीकरणा नंतर घरा घरातील बचत बाजाराकडे येण्यास सुरुवात झाली आहे.मॉर्गन स्टॅनली च्या अंदाजाने येत्या दहा वर्षात ही रक्कम USD 425-825 billion इतकी असेल
आणि असे झाले तर निफ्टी नक्कीच डबल धमाका करेल .
तुम्हाला काय वाटते ?
