तामिळनाडूमधलं उटी. तुमच्यापैकी बर्याचजणांनी या हिल स्टेशनला भेट दिली असेल. उन्हाळ्यात आवर्जून विसावा घेण्याजोगं हे कूल डेस्टीनेशन. इथं भेट देण्यासाठी आणखी एक भारी निमित्त म्हणजे इथलं बोटॅनिकल गार्डन. या गार्डनमध्ये दरवर्षी मे महिन्यात मसाले प्रदर्शन, फळभाज्यांचे प्रदर्शन, गुलाब प्रदर्शन, फुल प्रदर्शन अशी वेगवेगळी प्रदर्शनं आयोजित केली जातात. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला यंदाचा फ्लॉवर शो १९ मे ते २१ मे असे तीन दिवस चालणार आहे.
फ्लॉवर शो मधील काही विहंगम दृश्ये...






या वर्षीच्या रोझ डे मधील सुंदर कलाकृती...





यावर्षीचा हा १२१वा फ्लॉवर शो असुन जवळपास १५००० प्रकारच्या देशी विदेशी फुलांचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता...