आपण खूपच उत्सुकतेने चित्रपट पाहायला आलेलो असतो, पण चित्रपट काही लगेच सुरु होत नाही. त्याधी सिनेमांचे ट्रेलर, जाहिराती वगैरे दाखवून मग चित्रपटाला सुरुवात होते. यावेळी चित्रपट कोणताही असला तरी भारत सरकारची सिगरेट विरोधी जाहिरात हमखास दिसते. ही जाहिरात एवढ्या वेळा दाखवली गेली आहे की माणसांना आता कंटाळा आलाय राव.
ही जाहिरात कितीही कंटाळवाणी वाटली तरी यात एक लहान मुलगी आपलं लक्ष वेधून घेते. या मुलीचं नाव आहे ‘सिमरन नाटेकर’. आता ती १९ वर्षांची आहे. २००२ पासून तिने आपल्या करीयरची सुरुवात केली. दावत-ए-इश्क मध्ये ती फरीदाच्या रोल मध्ये दिसलेली. शिवाय अनेक जाहिरातीत तिने काम केलंय.
मंडळी आज बघुयात या लहान गोंडस मुलीचं पालटलेलं रूप. ही लहान मुलगी आता लहान नाही राहिली भाऊ. खालील फोटोवरून तुम्हाला अंदाज येईलच :




