या चौकोनातली नेमकी तिरपी किंवा वक्ररेषा शोधून दाखवा!! भल्याभल्यांना हे जमले नाहीय!!

या चौकोनातली नेमकी तिरपी किंवा वक्ररेषा शोधून दाखवा!! भल्याभल्यांना हे जमले नाहीय!!

सोशल मीडियावर पजल किंवा ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टीभ्रम सोडविणे म्हणजे डोक्याचा भुगा करून घेण्याचे काम असते. तरीदेखील मेंदू रिफ्रेश करण्यासाठी हे इल्युजन महत्वाचे असतात. आज असेच एक ऑप्टिकल इल्युजन तुम्ही बघणार आहात.

जेनोमिक्स संशोधक लॉरेल कुन्स यांनी एक ऑप्टिकल इल्युजन सादर केले आहे. यात एक चौकोनात छोटे छोटे चौकोन आहेत. या प्रत्येक चौकोनाला हिरव्या रंगाची किनार आहे. त्यांनी लोकांना सोपे चॅलेंज केले आहे. लोकांना या चित्रात वक्राकार रेष शोधायची आहे.

लोकांनी या चौकोनांवर नजर फिरवली तर जिकडेतिकडे तिरपी रेषच दिसत होती, पण क्षणातच ती सरळही दिसत होती. त्यामुळे यात नेमकी तिरपी किंवा वक्र रेषा कुठली हे शोधून काढणे प्रचंड कठीण असल्याची जाणीव लोकांना झाली. साहजिक हे इल्युजन वायरल व्हायला वेळ लागला नाही.

यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. यावर एकाने उत्तर दिले की, 'तिरपी रेषा सर्वच ठिकाणी आहे, पण कुठल्याही ठिकाणी नाही.' याच अर्थाच्या अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. यावर शास्त्रज्ञांनी या फोटोत एकाच ठिकाणी पाहत राहिल्यास मेंदू नेमका काय दृष्टीभ्रम आहे हे ओळखू शकत असल्याचे सांगितले आहे.

गेल्याच आठवड्यात क्विन्सलँड विद्यापीठातील डेरेक अरनॉल्ड नावाच्या एका व्हिजन एक्सपर्टने सांगितले होते की अशी कोडी ही लोकांना मुख्यतः घाबरवण्यासाठी असतात. असे असले तरी लोक मात्र या कोड्यांवरून वेगवेगळ्या थियऱ्या इंटरनेटवर मांडणे मात्र सोडत नाहीयेत.

उदय पाटील