हे ठोकळे स्थिर आहेत!! विश्वास बसत नाही? मग या दृष्टीभ्रमामागचं कारणही वाचा!!

हे ठोकळे स्थिर आहेत!! विश्वास बसत नाही? मग या दृष्टीभ्रमामागचं कारणही वाचा!!

इंटरनेटवर मनोरंजन किँवा माहितीसाठी फिरणारे लोक खूप असतात. त्यात अजून एक वर्ग असतो जो मनोरंजन आणि डोक्याला खुराक एकाच गोष्टीत शोधत असतो. कोडी आणि दृष्टीभ्रम आवडणारा मोठा वर्ग आहे. ही कोडी सोडवून जबरदस्त मजा येते, त्यात मेंदूलाही चालना मिळते. असा डबल फायदा यातून होतो.

सध्या ट्विटरवर असेच एक ऑप्टिकल इल्युजन लोकांच्या डोक्याला त्रास देत आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने 'खालील ठोकळा सरकत नाहीये' असे कॅप्शन देऊन एक दृष्टीभ्रम म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन पोस्ट केले. पण पोस्टमध्ये तर ठोकळा सरकताना दिसतो. नेमकी काय भानगड आहे हे मात्र लोकांना कळत नव्हते.

आता याची उकल अशी करण्यात आली. ठोकळ्याच्या रेषा सतत ब्लॅक अँड व्हाइटमध्ये बदलत आहेत, तर ठोकळ्यातले बाण हे विरुद्ध दिशा दाखवत आहेत. यामुळे होते असे की हा ठोकळा सरकत आहे असे वाटते. आता वाचून झाल्यावर हे इल्युजन सोपे वाटू शकते. पण वाटते तितके सोपे नाही, हे दृष्टीभ्रम बघितल्यावरच समजते.

हा नजरबंदीचा खेळ रिव्हर्स फी इल्युजन म्हणून ओळखला जातो. यामुळे सतत बदलणाऱ्या प्रकाशामुळे मेंदूला समोरची वस्तू सरकत आहे असा भास होतो. पण खंरतर ती वस्तू जागची हललेलीही नसते. हा व्हिडिओ पोस्ट होऊन ४ दिवसही झालेले नाहीत, तरी जवळपास ४० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाह्यला आहे यावरून हा दृष्टीभ्रम लोकांना किती आकर्षित करत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

उदय पाटील