आता भारतीय पद्धतीचं खाणं जगभर मिळतं. पनीर, डोसे वगैरे मिळतंच, पण कित्येक वर्षांपासून जगभर इंडियन करी जाम प्रसिद्ध आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रांतात आणि जातीतच काय, प्रत्येक घरात करी-म्हणजे आमटी करायची पद्धत वेगळी असते. पण सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून जी भाजी तयार होते तिला इंग्लिश मध्ये Curry म्हणतात.
पण या प्रसिद्ध झालेल्या करीच्या नामकरणाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? असं म्हणतात की या शब्दाचा शोध चुकून लागला होता राव!!



