अनेक मोठ्या कंपन्या आपल्या वस्तू जास्तीतजास्त प्रमाणात विकल्या जाव्यात यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करत असतात. त्यासाठी त्यांचा मार्केटिंग विभाग विविध डोक्यालिटी लढवत असतो. पण जर का यात काही चूक झाली तर कंपनीला त्यांचीच कल्पना अंगाशी येऊ शकते.
काही वर्षांपूर्वी पेप्सी कंपनीने फिलीपाईन्स देशात एक स्कीम काढली होती. त्यांनी पेप्सीच्या बाटलीच्या झाकणावर तीन अंकी क्रमांक लिहिला. हा क्रमांक जर जिंकणाऱ्या क्रमांकाशी जुळला तर त्या व्यक्तीला १५ लाख रुपये मिळतील. एकार्थी हे लकी ड्रॉ सारखेच होते.



