लोक सध्या गाड्यांना पर्याय शोधायला लागले आहेत. पेट्रोल आणि गाड्यांच्या किमती दोन्ही काय परवडेबल राहिल्या नाहीत. लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. मात्र औरंगाबाद येथील एका गृहस्थांनी थेट घोड्याकडे मोर्चा वळवला आहे. घोड्यावरून कामाला जाणारा हा माणूस बघून लोक मात्र जागीच थबकत आहेत.
युसूफ शेख हे ५० वर्षीय गृहस्थ लॅब असिस्टंट म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊन लागण्यापूर्वी सर्व ठीक होते, पण लॉकडाऊन लागले आणि अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. यावेळी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या सुटल्या, काहींच्या नोकऱ्या राहिल्या पण पगार बरेच कमी झाले. काही असो, पण नेहमीइतका किंवा काहीच पगार नसल्याने लोकांना घर चालवण्यासाठी दुसरे काम शोधणे भाग पडले.
युसूफ शेख यांनी काही लोकांना सोबत घेऊन आवश्यक सेवेची कामे जसे भाजीपाला विकणे असे काम सुरू केले. जाधववाडी मार्केटमधून होलसेल सामान घेऊन औरंगाबाद शहरात विकत त्यांनी पैसे येण्याचे काम सुरू झाले. हळूहळू गोष्टी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आणि लोकांना कामावर परत येण्यास सांगण्यात आले.

