भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. गेल्या सामन्यात तिने महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. दरम्यान इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात तिने असा काही कारणामा केला आहे, जो आजवर कुठल्याही महिला गोलंदाजाला करता आला नव्हता.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत झुलन गोस्वामी अव्वल स्थानी आहे. तसेच तिच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तिने आपल्या कारकीर्दीत २५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. हा पल्ला गाठणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
झुलन गोस्वामीला वगळता इतर कुठल्याही गोलंदाजाला २०० गडी देखील बाद करता आले नाहीये. झुलन गोस्वामीनंतर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाची माजी कॅथरीन फिट्झपॅट्रिक आणि वेस्ट इंडिजची अनिसा इक्बाल आहे. कॅथरीनने १३९ वनडेमध्ये आणि अनिसाने १०९ वनडे सामन्यांमध्ये प्रत्येकी १८०-१८० गडी बाद केले आहेत. कॅथरीनने निवृत्ती जाहीर केली असून अनिसा इक्बाल अजूनही खेळत आहे. तिला २०० गडी बाद करण्याची संधी आहे.
झुलन गोस्वामीने २५० वा गडी महिला विश्वचषक स्पर्धेत पटकावला आहे. तिने टॅमी ब्यूमोटला बाद करता इतिहास रचला आहे.
