मंडळी, फोटोग्राफीमध्ये परफेक्ट वेळ महत्वाची असते. या बरोबर कॅमेराने वेळीच तो क्षण टिपला तर अफलातून फोटो मिळतो. स्टीव्ह बिरो या फोटोग्राफरच्या १० वर्षाच्या करियरमध्ये असाच एक क्षण आला होता. त्याने या क्षणी जो फोटो टिपला तो लाखात एक आहे.
पाण्यावरून झेपावणारा गरुड, त्याचे पंख बरोबर पाण्यावर टेकलेले आणि या सगळ्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब अप्रतिमरीत्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. राव, हा एक दुर्मिळ फोटो आहे.
स्टीव्ह बिरोने हा फोटो ४ मे रोजी कॅनडाच्या कॅनेडियन राफ्टर कंझर्वेंसी येथे घेतला होता. गरुड पाण्यावरून उडत येतोय असा शॉट त्याला पाहिजे होता. त्यासाठी तो तासभर पाण्याजवळ बसून राहिला. अखेर जेव्हा गरुड तिथे आला तेव्हा त्याने लागोपाठ १०० फोटोग्राफ्स क्लिक केले. तो म्हणतो की “गरुडाच्या चेहऱ्यावरचा राग दुर्लक्षित करून मी फोटो घेत राहिलो.”

