आता तुमचं नाव पाठवा थेट मंगळ ग्रहावर....नासाने दिलीय ऑफर !!

लिस्टिकल
आता तुमचं नाव पाठवा थेट मंगळ ग्रहावर....नासाने दिलीय ऑफर !!

मंडळी, आजवर आपण अनेकदा नासा, इस्रोच्या मिशनबद्दल ऐकलं असेल, पण आता आपल्याला या मिशनमध्ये सामील होता येणार आहे. हे मिशन पण साधंसुधं नाही. नासा मंगळ ग्रहावर आपलं यान पाठवणार आहे.

या मिशनमध्ये आपण कसे सामील होऊ शकतो? चला समजून घेऊया !!

मंडळी, नासाने २०२० च्या “मिशन मंगल”साठी लोकांना आपली नावं द्यायला सांगितली आहेत. ही नावं एका सिलिकॉन चीपवर छापण्यात येतील. यासाठी खास मायक्रो बिमचा वापर केला जाईल. या एका चीपवर लाखो नावं छापली जाऊ शकतात. ही नावं केसापेक्षाही लहान आकारात असतील. ही चीप नंतर “मार्स २०२० रोवर” मध्ये बसवून मंगळवर पाठवण्यात येणार आहे. नासाचा “मार्स २०२० रोवर” काहीसा असा दिसतो.

राव, यासाठीची प्रक्रिया अगदी सोप्पी आहे.

https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020/ या लिंकवर जाऊन तुम्हाला आपली माहिती भरायची आहे. तुमचं नाव, आडनाव, देशाचं नाव, पिनकोड, आणि इमेल आयडी भरला की तुम्हाला एक बोर्डिंग पास मिळतो. या बोर्डिंग पासवर यान कुठून निघणार आहे, कधी पोहोचेल, आपला क्रमांक काय आहे हे सगळं लिहिलेलं असेल. एक लक्षात ठेवा तुम्हाला ३० सप्टेंबरच्या आत नाव पाठवावं लागणार आहे.

आहे की नाही सोप्पं?

नासाच्या मिशनबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

नासाच्या मिशनबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

नासाचं यान जुलै २०२० साली मंगळ ग्रहाच्या दिशेने निघणार आहे. फेब्रुवारी २०२१ ला हे यान मंगळवर पोहोचेल. फार पूर्वीपासून मंगळवर जीवन होतं असं म्हटलं जातं, या संदर्भात आणखी शोध घेण्यासाठी हे मिशन महत्वाचं ठरेल. याखेरीज मंगळ ग्रहावरचं वातावरण, तिथलं भूगर्भशास्त्र यांचा पण अभ्यास केला जाईल.

मंडळी, या महत्वाच्या मिशन सोबत आपलं नाव छापलं जाणार आहे. आपण असं म्हणू की ज्यांची ज्यांची नावं छापली जातील ते एक प्रकारे मंगळावर पोहोचणारे पहिले मानव असतील. नावात काय असतं म्हणणाऱ्यांना हे ही बातमी नक्की सांगा..

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख