भाऊ काही लेजेंडरी माणसं लै म्हणजे लैच भारी प्रपोज करतात. त्या चीनच्या पोरट्यानं प्रपोज करताना आयफोन दिला राव. प्रपोज करायला असा जिगर लागतो. काही भारी लोकांना एवढा कॉन्फीडन्स असतो की ते सगळ्यांसमोर प्रपोज करतात. आता मला सांगा पब्लिक समोर ती नाही म्हनली तर किती नाक कापल्यागत हुईल? तरी प्रपोज करनारे लेजेंड असतातच. आपल्या बाच्यानं काय हे होणार नाय.
मंडली, आज सकाळ सकाळी प्रपोजचं नाव काढायचं निमित्त असं की, एका पायलटनं डायरेक्ट एअर हॉस्टेसला प्रपोज केलंय, ते पण थेट विमानात!! राव, एअर हॉस्टेसवर सगळेच लाईन मारतात म्हना.. पण पायलटनं मौके पे चौका मारलाय.
जॉन इमरसन हा अमेरिकेत पायलट हाये. डेट्रॉइट इथनं विमान टेकऑफ व्हायच्या आधीच एक प्रपोज कार्यक्रम पार पडला. जॉनने फ्लाईटबद्दल माहिती देता देता लोरेन या आपल्या गर्लफ्रेंडला चक्क लग्नाची मागणी घातली. जॉन भाऊचं नशीब थोर, तिने लगेच होकार पण दिला. मग जॉनने वेळ न घालवता तिला अंगठी घातली. अन हे सगळं याची देही याची डोळा बघत असलेल्या पॅसेंजर लोकांनी टाळ्या वाजवत एकच कल्ला केला ना राव.
मंडली प्रपोज करायचा तर असा...काय म्हणता?
आणखी वाचा :
त्याने प्रपोज करताना मुलीला तब्बल २५ आयफोन्स दिले, पण या आयफोन्सचं पुढे काय झालं ?
