मंडळी, आजकाल व्हाट्सअॅप न वापरणारा माणूस शोधणं तसं लै अवघड होऊन बसलंय! अगदी लहान-थोर, गरिब-श्रीमंत, स्त्री-पुरूष असा कोणताही भेद न ठेवता जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये या व्हाट्सअॅपनं आपली हक्काची जागा मिळवलीये. अॅप मार्केटमध्ये या व्हाट्सअॅपला पर्याय म्हणून 'वायबर', 'लाईन', 'वुईचाट' असे अनेक इन्स्टंट मेसेंजर अॅप्स उपलब्ध असतानाही व्हाट्सअॅप लोकप्रियतेच्या बाबतीत या सर्वांच्या खूपच पुढं आहे. आज रोजी प्ले स्टोअरवरून जवळपास १०० कोटींपेक्षा अधिक वेळा व्हाट्सअॅप डाऊनलोड केलं गेलंय!
असं असलं तरी भारतात या व्हाट्सअॅपला आव्हान मिळतंय ते आपल्या स्वदेशी' 'हाईक मेसेंजर' अॅपचं. आतापर्यंत ५ कोटींपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड केल्या गेलेल्या हाईक मेसेंजरची लोकप्रियता त्यात मिळणाऱ्या अनोख्या फीचर्समुळे दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. हाईक मेसेंजरमध्ये असं काय आहे बुवा जे व्हाट्सअॅप किंवा इतर इन्स्टंट मेसेंजरमध्ये नाही? चला एक नजर टाकूया..





