हम दिल दे चुके सनम!! ८०-९० च्या दशकात जन्माला आलेल्या अख्ख्या एका पिढीला वेड लावणारा सिनेमा.
संजय लीला भन्साळीचे डायरेक्शन, तगडी स्टारकास्ट, इस्माईल दरबारचे म्युझिक, जबरदस्त गाणी असा एकसे बढकर एक कॉकटेल झाल्यावर 'हम दिल दे चुके सनम'चा हँगओव्हर आजही उतरलेला नाही.सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कायच्या काय भन्नाट असणारी स्टोरी!! ही कहाणी अनेकांच्या मनात कालवाकालव करणारी ठरली होती.
आता तुम्ही म्हणाल तुमचे सर्व खरे आहे पण आम्हाला हे सर्व माहीत असताना परत का सांगताय?
तर या सिनेमाच्या कहाणीमागील जी सत्य कहाणी आहे ना ती यापेक्षा भन्नाट आहे. संजय लीला भन्साळी तसा अवलिया माणूस त्याने ही कहाणी उचलून जन्माला आला हम दिल दे चुके सनम!!अशा साहित्यिक किंवा वाङ्मयीन निर्मितीची चोरीला इंग्रजीत Plagiarism हा शब्द वापरला जातो. भारतात Plagiarismचा धंदा फार जोरात चालतो. सोप्या शब्दात साहित्यिक चोरी म्हणजे पुस्तकांची, साहित्यकृतींची कॉपी करणे. संजय लीला भन्साळीचे नशीब , त्याने केलेल्या चोरीवर कोणीच तक्रार केली नाही आक्षेप घेतला नाही आणि कोणीही न्यायालयाकडे दाद मागितली नाही.,
चला तर आज वाचू पडद्यामागची सत्यकथा या चित्रपटाची !




