प्रतिभा – साहित्य संवाद विशेषांक: पुरातन भारतीय संस्कृती ते आजचा भारत असा प्रवास चितारणारा दिवाळी अंक !

लिस्टिकल
प्रतिभा – साहित्य संवाद विशेषांक: पुरातन भारतीय संस्कृती ते आजचा भारत असा प्रवास चितारणारा दिवाळी अंक !

मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना ११२ वर्षांची तेजस्वी परंपरा आहे.ह्या परंपरेला साजेसे आणि दर्जेदार अंक प्रकाशित करून व्यास क्रिएशन्सही आपला ठसा उमटवीत आहे. गेली १६ वर्षे प्रतिभा दिवाळी अंकाच्या रूपाने एक दर्जेदार साहित्यलेणं वाचकांना देत आहेत. विविध विषयांना वाहिलेले विशेषांक ही प्रतिभा दिवाळी अंकाची खासियत. यंदा साहित्य – संवाद हा विषय वाचकांसाठी घेऊन येत आहेत. साहित्य हा  समाजमनांना जोडणारा दुवा आहे.साहित्याच्या विविध प्रकारांनी हा संवाद समृद्ध केला आहे.

यंदाच्या दिवाळी अंकात असलेलं याचं प्रतिबिंब वाचकांना नक्कीच आवडेल. संवादाची साहित्यातील माध्यमे, ज्या साहित्य प्रकारातून संवाद घडतो, वाचक आणि लेखक यांच्यात एक वैचारिक नातं निर्माण होतं, अशा विविध साहित्य प्रकारांवर यात प्रकाश टाकला आहे. कथारंग, ललित सुगंध, काव्योत्सव या साहित्य विभागातून साहित्य आणि संवादाचे विविधांगी रूप दिसून येते.

स्मृतिशलाका या विशेष मालिकेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शांताबाई शेळके, द, मा. मिरासदार, वसंत बापट, ग.दि. माडगुळकर यांना शब्दपुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त पुरातन भारतीय संस्कृती ते आजचा भारत असा प्रवास चितारला आहे. एकूणच वाचकांना वैचारिक मेजवानी प्रतिभा दिवाळी अंकातून मिळेल.