पाकिस्तान बरोबर पहिला सामना हरल्यावर भारतीय संघ न्यूझीलँड विरुद्ध काल झालेल्या सामन्यात आशेने भारतीय संघाकडे पाहत होता. पण न्यूझीलँडने पाकिस्तानपेक्षा वाईट पध्दतीने भारतीय संघाचा दारुण पराभव केला. सामना सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांत निकाल पक्का झाला इतके वाईट भारतीय खेळाडू खेळले. भारताचे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न संपले असेच अनेक चाहत्यांना वाटत आहे. पण इतक्यात घाई करण्याची गरज नाही. काही गोष्टी व्यवस्थित झाल्या तर आपण पुढच्या फेरीत धडक देऊ शकतो. ते कसे हे जाणून घेऊया.
भारत आणि न्यूझीलँड तीन सामने अजून राहिले आहेत त्यात स्कॉटलँड, नामिबिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. भारताला तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. पण त्यात न्यूझीलँडला अफगाणिस्तानने हरवणे 'मस्ट' आहे. म्हणजेच भारताच्या आशा आता अफगाणिस्तानवर टिकल्या आहेत.
भारताला तिन्ही सामने जिंकावे लागतील तर न्यूझीलँड एक सामना हरला पाहिजे. यामुळे भारत आणि न्यूझीलँड या दोन्हींचे सहा गुण होतात. पुढच्या फेरीतील प्रवेश मग नेट रनरेटने दिला जाईल. म्हणजे भारताला हे सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील आणि न्यूझीलँड पण एकदा तरी हरायला पाहिजे लका.
जसे शॉशँक रिडंप्शन सिनेमात प्रसिद्ध डायलॉग आहे. आशा ही भारी गोष्ट आहे, आशा माणसाकडून कित्येक गोष्टी करवून घेऊ शकते. आता हीच आशा आपल्याला ठेऊन चालावी लागेल. अपेक्षा ठेवण्यात काहि गैर नाही. पुढे आपला संघ काय कामगिरी करतो हे समजलेच.
उदय पाटील
