राकट, कणखर आणि दगडांच्या देशातल्या आपल्या महाराष्ट्राच्या मुलींना काही कमी समजू नका राव.. त्यांच्या वाटेला जाल, तर जाम गोत्यात याल. याचा एक चांगलाच अनुभव वृंदावनच्या भोंदू पुरोहिताला आलाय. त्याचं चक्क धोतर फेडून या मुलींनी त्याला असा मारलाय ना... पुन्हा तो असं काही करायच्या फंदात पडेल असं वाटत नाही...
वाचा तर मग काय झालं ते...
वृंदावनमध्ये भागवत शिकवणाऱ्या एका भोंदू पुरोहिताला दोन मुलींनी बेदम चोप दिला आहे. या मुली मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. ३ महिन्यांपूर्वी या पुरोहिताने दोघींना भागवत कथा शिकवण्याच्या बहाण्याने वृंदावनमध्ये आणलं होतं. वृंदावन मध्ये आणल्या नंतर त्याने भागवत शिकवण्याऐवजी या मुलींचा लैंगिक छळ केला. त्याच्या या कृत्याला दोघींनी चांगलाच धडा शिकवला.
या पुरोहिताचं नाव आहे ‘वासुदेव शास्त्री’. झालं असं की, लाहोरी आणि पुणे भागातल्या या मुलींना वासुदेव शास्त्रीने वृंदावनमध्ये आणलं. ‘तुमच्या मुली हुशार आहेत, मी त्यांना भागवत कथा शिकवतो’ असं सांगून त्याने मुलींच्या आई वडिलांना परवानगी देण्यास भाग पाडलं. वृंदावनमध्ये आल्यानंतर तिघेही ‘नेपाळी कॉलनी’ मध्ये राहू लागले. त्यांचं भागवताच शिक्षण सुरु झालं. शिक्षणादरम्यान त्याने दोघींना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली होती. त्यांना त्यांच्या आई वडिलांशी बोलण्याचीही परवानगी नव्हती. घरच्यांशी फोनवर बोलताना तो त्यांना एकटं सोडत नसे. एवढंच नाही तर मुलींनी सांगितल्या प्रमाणे या वासुदेव शास्त्रीने त्यांचा लैंगिक छळ देखील केला.
३ महिन्याच्या कालावधीनंतर दोघींना आपल्या घरच्यांना ही बातमी कळवण्यात यश आलं. त्यांनतर बातमी पोलिसांपर्यंत गेली आणि पोलिसांनी वासुदेवला अखेर जेरबंद केलं. पण पोलिसांचा पाहुणचार घेण्याआधी या दोघींच्या हातून त्याला चांगलाच प्रसाद मिळाला.
