यमुनेच्या पात्रात सध्या पाणी नाहीय. प्रदूषणामुळे ताजमहालचं नुकसान होत आहे, लोकांना प्यायला पाणी नाहीय. या समस्येवरती उपाय म्हणून सरकारने यमुना नदीत पाणी सोडावं म्हणून 'रिव्हर कनेक्ट अभियान’चे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा वेगळाच मार्ग त्यांनी शोधून काढलाय , तो म्हणजे नदीच्या पात्रात रेतीने आंघोळ करण्याचा. "जर भविष्यात पाणी मिळालं नाही, तर असं रेतीनेच स्नान करावं लागेल हे आम्ही या आंदोलनाद्वारे सांगू इच्छितो" असं या आंदोलकांचं म्हणणं आहे.
या पूर्वीही महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोकांनी नागिन डान्स करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये आंदोलन केलं होतं.
