मध्यप्रदेशातल्या ’सागर’ या ठिकाणच्या रविंद्रभवन इथे एक हितग्राही संमेलन होतं. त्या दरम्यान काही चेक्स म्हणजेच धनादेशांचंही वाट्प होत होतं. एका लाभार्थी स्त्रीचं नांव पुकारल्यावर स्टेजवर चेक आणायला जाताना बाळ कुठे ठेवावं म्हणून ती आसपास पाहू लागली आणि जवळ उभ्या असलेल्या एका स्त्रीच्या हाती बाळ सोपवून ती स्टेजवर चेक आणायला गेलीही.
कोण होती ती शेजारी उभी असलेली स्त्री?
त्या दुसर्या-तिसर्या कोण नसून महाराष्ट्रातल्या ंमुंबई उत्तर-मध्य भागातल्या बीजेपीच्या खासदार पूनम महाजन होत्या. त्यांनीही आढेवेढे न घेता सहजपणे त्या बाळाला घेतलं आणि त्याची आई परत येईपर्यंत बाळाला खेळवलंही.
हे काही विशेष काम नसलं तरी पूनम महाजनांच्या या कृतीचं प्रसार माध्यमांतून कौतुक होत आहे. पण त्याचसोबत मुंबईच्या खासदार मध्य प्रदेशात काय करत होत्या अशी कुजबूजही होत आहे.
