व्हिडीओ ऑफ दि डे : या पुणेकर बाईंनी बाईकस्वारांना असा दाखवला पुणेरी इंगा !!

व्हिडीओ ऑफ दि डे : या पुणेकर बाईंनी बाईकस्वारांना असा दाखवला पुणेरी इंगा !!

आपल्याकडे फुटपाथचा वापर चालण्याखेरीज सगळ्या गोष्टींसाठी होतो. ट्राफिकच्यावेळी तर फुटपाथ पर्यायी रस्त्याचं काम करतो. अशावेळी चालणाऱ्याने कुठून चालायचं ही एक डोकेदुखी असते. या रोजच्या कटकटीला  कंटाळून एका पुणेकर बाईंनी बाईकर्सची चांगलीच शाळा घेतली आहे. हा व्हिडीओ पाहा.

जे काम ट्राफिक पोलीसांनी करायला हवं ते काम या बाई करत आहेत. बाइकवाले बेशिस्त वागून पदपथावर चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालत असतो हे बाईक स्वारांच्या लक्षात यावे म्हणून या काकूंनी पुढाकार घेतला. या व्हिडीओला आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  लोकांनी पुणेकर बाईचं कौतुक केलंय. एवढंच नाही तर पुणे पोलिसांनी या व्हिडीओची दाखल घेऊन ट्विट केलं आहे.

काही आठवड्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी हॉर्नचा आवाज काबूत आणण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली होती. आमचा हा लेख वाचायला विसरू नका.