पोट्रेट म्हणजे तैलचित्र, रेखाटन किंवा छायाचित्र. चित्रकलेच्या या प्रकारात वस्तू अगर व्यक्तींचे डोळे, ओठ, हात, त्यांचे सौंदर्य, निरागसता, यासारखे भाव टिपून त्याचं चित्र उभं केलं जातं. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रतिमेतून साधलेले व्यक्तिचित्र! व्यक्तिचित्रण शब्दात करायचे झाले तर पाच -दहा हजार शब्द लागतात, पण हे एकाच प्रतिमेतून जेव्हा समोर ठेवले जाते तेव्हा त्याला म्हणायचे पोर्ट्रेट ! ही पोट्रेट्स आपण आपल्या घरांमधून सजवतो.
पण तुम्हास माहिती आहे का? की प्रत्येक पोट्रेट किंवा छायाचित्र एक कहाणी सांगते. त्यांचेही एक जग असते. या जगात त्यांची गोष्ट लपलेली असते.













