कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे सध्या विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. २३ मार्च २०२० पासून भारतातील आंतरराष्ट्रीय एअर प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला. पण नुकताच भारताने एअर बबल हा करार केला आहे. या द्वारे दोन देशातील पात्र प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील.
शनिवारी श्रीलंकेबरोबर हा एअर बबल (Air Bubble) करार झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विट करत सांगितले, करारानुसार सार्क विभागातील सहा देश आणि इतर एकूण २८ देशांशी एअर बबल करार करण्यात आला आहे. एअर बबल म्हणजे एक द्विपक्षीय करार आहे ज्यात नियम आणि निर्बंध असतात. त्या अटी पाळून दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतात.


