जाणून घ्या १० रुपयाच्या नव्या नोटेबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे !!

जाणून घ्या १० रुपयाच्या नव्या नोटेबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे !!

नोटबंदीनंतर सर्वच नोटांचा मेकओव्हर सुरु झालेला आहे राव. आधी २००० ची नवी कोरी नोट आली, त्याचबरोबर ५०० जुनी नोट जाऊन नवी नोट आली..  काही महिन्यांपूर्वी २०० आणि ५० रुपयांची नवी नोट आली. आता यानंतरचा नंबर आहे १० रुपयाच्या नोटेचा. मंडळी, रिझर्व बँकेने १० रुपयाची नवीन नोट कशी असेल याची झलक नुकतीच दाखवली आहे. ही नवीन नोट खालील चित्रात तुम्ही पाहू शकता.

स्रोत

महात्मा गांधीचा फोटोसमोरील बाजूस असणाऱ्या नोटांमध्ये या नव्या नोटेचा समवेश होणार आहे. ही नवीन नोट चॉकलेटी ब्राऊन रंगात असेल. म्हणजे जुन्या नोटेपेक्षा हिचा रंग थोडा गडद असेल. नोटेच्या पाठीमागे ऐतिहासिक वास्तूंचे फोटो असण्याची परंपरा इथेसुद्धा दिसून येईल. या नोटेवर कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे नवीन नोट आली, तरी जुन्या नोटा बाद होणार नाहीत.

स्रोत

याआधी २०१० साली १० रुपयाच्या नोटेमध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता संपूर्णपणे नवी नोट आरबीआयने छापली आहे. सध्या १०० कोटी नोटा छापून तयार असल्याने थोड्याच दिवसात ही नवी कोरी करकरीत नोट तुमच्या हातात असेल.