ओळखा पाहू या अजगराच्या पोटात काय आहे?

ओळखा पाहू या अजगराच्या पोटात काय आहे?

तुम्हांला हे तर माहितच असेल की अजगर त्याचं भक्ष्य चावून खात नाही, तर तो भक्ष्य पूर्ण गिळतो आणि शरीराचं वेटोळं करत पोटातल्या प्राण्याची हाडं हळूहळू मोडत जातो. असं आख्खं गिळलेलं अन्न हळूहळू पचतं. गुजरातमधल्या जुनागढजवळच्या जंगलातल्या एका अजगराने घेतलेला घास मात्र त्याला झेपला नाही. 

तर या सहा मीटर लांबीच्या अजगराने गिळला चक्क एक काळवीट. हा हा काळवीट अजगराच्या पचवण्याच्या मानाने चांगलाच मोठा निघाला.    मग त्याचं पोट टम्म फुगलं, हालचाल करता येईना. असा सुस्तावलेला आणि हालचाल करू न शकणारा का असेना, तो आहे अजगर. त्याला शेतात पाहून लोक भ्यायले आणि कदाचित लोकांनी त्याला मारलेही असते. नशीबाने त्याला वेळीच एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्याच्या पोटातला काळवीट पूर्ण पचला की हा अजगर पुन्हा एकदा जंगला सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.