इथं जगभर जनता ’आयफोन ७ घ्यायचा असेल तर किडनी विकावी लागेल ’ छापाचे जोक करतेय आणि तिकडे चीनमधल्या वॉंग सिकॉंग (Wong Sicong) या अतिश्रीमंत बापाच्या मुलाने कुत्र्यासाठी एक नाही, दोन नाही, चक्क आठ आयफोन ७ घेतले आहेत. सध्याचा लेटेस्ट असा आयफोन ७ हा जगात सगळीकडे महागच आहे. चीनमधल्या आठ आयफोन्सची किंमत जवळजवळ पाच लाख रूपयांहून अधिक होईल. आणि एवढं करून त्या कुत्र्याला या सगळ्या फोन्सचा उपयोग काय हा प्रश्न आहेच.
सिकॉंगचे बाबा वॉंग जिऍनलीन हे २०१५ मधल्या एका सर्व्हेनुसार चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि हा त्यांचा मुलगा दोन्ही हातांनी पैसे उडवतोय. त्याच्या या कुत्र्याचं चीनमधल्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हेरिफाईड अकाऊंट आहे आणि त्याचे जवळजवळ वीस लाख फॉलोअर्स पण आहेत. तिथे या कुत्र्याचे अतिश्रीमंती थाटात राहण्याचे फोटोज शेअर केले जातात.
![]()
याआधी सिकॉंगने त्याच्या लाडक्या कुत्र्यासाठी दोन सोनेरी ऍपल स्मार्टवॉचेस घेतली होती आणि ती त्याच्या पुढच्या दोन्ही पायांत घातली होती. या सगळा मूर्खपणाचा कळस वाटत असला तरी, जे माणसांना मिळत नाही ते कुत्र्याला मिळताना पाहून लोकांना हळहळ वाटतेय.
