आरपीएफ जवानाने प्रवाशाला मरणाच्या दाढेतून खेचून आणलं...पाहा हा व्हिडीओ!!

लिस्टिकल
आरपीएफ जवानाने प्रवाशाला मरणाच्या दाढेतून खेचून आणलं...पाहा हा व्हिडीओ!!

मंडळी, रेल्वेतील गर्दी जसजसी वाढत आहे तसतसे अपघाताचे प्रमाण पण वाढत आहे. एवढ्या गर्दीत मदतीला उभे राहणारे पण कमी असतात कारण प्रत्येकजण स्वतःच्या धावपळीत असतो. अशावेळी जर स्थानिक पोलीस मदत करत असतील तर ती मोठी गोष्ट असते!! तमिळनाडूत एक अशीच घटना घडली आहे. एका पोलीसाने एका प्रवाशाला मरणाच्या दारातून खेचून आणलं आहे.

तर झाल असं, की तमिळनाडुच्या कोइम्बतुर रेल्वे स्टेशनवर एक माणुस चालत्या रेल्वेत चढत होता. रेल्वेचा वेग वाढल्याने त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅकखाली सापडनार तेवढ्यात एका आरपीएफ अधिकाऱ्याने हे बघितलं आणि क्षणाचाही उशीर न करता त्याला एका हाताने पकडून रेल्वेत ढकललं.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्या पोलीसाचं सगळीकडे कौतुक होत आहे. त्या पोलीसाचं नाव पी वी जयन आहे. त्या दिवशी जयन यांना त्या स्टेशनवर काम देण्यात आलं होतं. जेव्हा त्यांनी प्रवाशाचा तोल जाताना बघितलं तेव्हा त्यांनी धाव घेऊन त्याला वाचवलं. जऱ त्यांनी ऐनवेळी चपळाई दाखवली नसती तर कदाचित त्या प्रवाशाचा जीव गेला असता!!

या कामासाठी जयन यांना रोख पैसे आणि मेरीट सर्टिफिकेट आलं आहे.

 

लेखक : वैभव पाटील