सरकारी डॉक्टर खुप कामचुकार असतात ही तक्रार आपण नेहमी ऐकत असतो. मुळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याबद्दल कुणाच्याही मनात चांगली भावना नसते. त्यात सरकारी डॉक्टर म्हणजे जिथे नोकरी आहे तिथल्या सरकारी दवाखान्यात हजेरी लावून स्वतःचा खाजगी दवाखाना चालवून डबल पैसा छापणारे हेच एकंदरीत चित्र सगळ्यांच्या मनात असते.
पण अशा वातावरणात काही लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुर्गम म्हणून ओळखला जातो, त्यातही धडगाव तालुका म्हणजे अतिदुर्गम तालुका. तिथे आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आदिवासी बहुसंख्याक असलेल्या या तालुक्यात नेते, अधिकारी सर्वांचेच तसे दुर्लक्ष!!








