१९८८ चे आणि २०१७ चे हे फोटो दाखवतात मुंबई बुडण्याची कारणं..

लिस्टिकल
१९८८ चे आणि २०१७ चे हे फोटो दाखवतात मुंबई बुडण्याची कारणं..

दर पावसाळ्यात एक दिवस असा असतो,  ज्यात मुंबईमध्ये दणकून पाऊस पडतो, ट्रेन बंद पडतात, जागोजागी पाणी साचायला लागतं आणि मग मुंबईकरांना आपला जीव वाचवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. सरकार दरवर्षी पावसाच्या तयारीचा दावा करते, पण बहुदा काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत. 

या वर्षी या सगळ्याची पुर्नउजळणी २९ऑगस्टला पाहायला मिळाली. नऊ किलोमीटरच्या ढगांच्या कृपेने सकाळपासून काही तासांत २०० ते ३०० मीमी पाऊस पडला आणि मुंबईचे ये रे माझ्या मागल्या सुरू झाले. या सगळया मागची कारणमीमांसा करायची झाल्यास सरकारच्या ड्रेनेज सिस्टम सुधारण्याच्या अपयशापासून ते आपल्या सतत घडणाऱ्या विकासाने निसर्गाची लावलेली वाट अशी अनेक कारणं आहेत. 

 

१९८८

१९८८

२०१७

२०१७

आपल्या अव्याहत चालणाऱ्या विकासाचा निसर्गावर होणारा परिणाम पाहण्यासाठी Quartz या वेबसाईटने मुंबईचा १९८८चा आणि २०१७चा सॅटेलाईट मॅप शोधून काढला. या सगळ्यात महत्त्वाची आढळलेली गोष्ट म्हणजे आपण जागोजागी भराव टाकून खाडी भरून काढणं, खारफुटीच्या जंगलाची केलेली तोडणी आणि नद्यांचं नाल्यात केलेलं रूपांतर.

१९८८

१९८८

२०१७

२०१७

या फोटोत आपल्याला डाव्या बाजूला मनोरी खाडी तर उजव्या कोपऱ्यात देसाई खाडीच्या मुखाशी झालेली खारफुटीची कत्तल बघायला मिळते.

१९८८

१९८८

२०१७

२०१७

या फोटोत शहराची झालेली वाढ आपल्याला बघायला मिळतेय. उजव्या बाजूला ठाण्याच्या अवतीभवती आणि डाव्या बाजूला दिसणारा हिरवा भाग म्हणजेच मालाडची खाडी, आणि दोन्हीकडे खारफुटीचं जंगल कसे कमी झालंय हेही दिसतंय.

१९८८

१९८८

२०१७

२०१७

या फोटोत आपली लाडकी मिठी त्या x आकाराच्या रन वेेच्या खाली पाहायला मिळते. मिठीने पावसाचे पाणी वाहून न नेणं हे २००५च्या पुराचं मोठं कारण होतं.

एकूणच आपण अजाणतेपणी निसर्गाचं फार मोठं नुकसान करत आहोत.