सुवर्ण पदक म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ऑलेम्पीक आणि राष्ट्रकुल सारख्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पण अशी ‘युनिक’ क्षेत्र आहेत जिथे सुवर्ण, रौप्य, ताम्र पदकांची कमाई होऊ शकते. आम्ही आज ज्या सुवर्णपदकाबद्दल बोलतो आहोत तो सुवर्णपदकाचा मान भारताच्या एका छोट्या राज्यातल्या ६६,००० शेतकऱ्यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल आहे.
फ्युचर पॉलिसी अवॉर्डस नावाच्या मोठ्या कार्यक्रमात ‘ऑरगॅनिक फार्मिंग’ म्हणजेच सेंद्रिय शेतीविषयक उत्तम कामगिरीसाठी ‘युनाटेड नेशन्स’तर्फे हे पारितोषिक दिले जाते. आणि कोणत्या राज्यामुळे हे पारितोषिक आपल्या पदरात पडले माहिती आहे का ?





