पुलंच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दाखवणारा 'भाई - व्यक्ती की वल्ली'.....ट्रेलर चुकवू नका !!!

पुलंच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दाखवणारा 'भाई - व्यक्ती की वल्ली'.....ट्रेलर चुकवू नका !!!

भाईंना आपण त्यांच्या पुस्तकातून पाहिलं, पण भाई खऱ्या आयुष्यात कसे होते ? त्यांचं आणि सुनीताबाईंचं नातं कसं होतं ? भाई व्यक्ती की वल्ली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळत आहेत.

भाई – व्यक्ती की वल्लीचे यापूर्वी २ टीझर येऊन गेले. त्यांना आपण पुलंच्या जडणघडणीतले २ अध्याय म्हणू. काल आलेल्या ट्रेलर मधून पुढचा अध्याय काय असेल याची एक झलक मिळाली. पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा भाग आहे. भाई त्यांच्या साहित्यातून आपल्याला नेहमीच दिसत आले आहेत, पण ते खाजगी आयुष्यात कसे होते याचा धांडोळा चित्रपटात घेतला गेला आहे.

पुलंच्या आयुष्यात जशा सुनीताबाई महत्वाच्या होत्या तशाच पुलंच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचाही त्या अविभाज्य भाग आहेत. इथे विशेष कौतुक आहे ते पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख आणि सुनीताबाईंच्या भूमिकेतील इरावती हर्षे यांचं. दोघांनीही पात्र छान वठवली आहेत.

तुम्ही पुलंचं साहित्य वाचलेलं असो किंवा नसो पण एक चित्रपट म्हणून ही नक्कीच २०१८ ची सर्वोत्तम ट्रिट असेल !! ४ जानेवारी, २०१९ रोजी सिनेमा थियेटर मध्येच जाऊन पाहायला विसरू नका, पण त्याआधी ट्रेलर पाहून घ्या !!

टॅग्स:

marathi moviemarathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख