नवाबी भोपाळचा स्मार्ट चेहेरा - भोपाळमध्ये स्मार्ट सायकल सुविधा म्हणजे पब्लिक बाइक शेअरींग..

नवाबी भोपाळचा  स्मार्ट चेहेरा - भोपाळमध्ये स्मार्ट सायकल सुविधा म्हणजे पब्लिक बाइक शेअरींग..

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मध्यप्रदेशातील भोपाळ, जबलपूर आणि इंदौर या शहरांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यापैकी भोपाळ शहराने अनेक स्मार्ट योजना आखून शहराला नवे रुप देण्याचा निर्धार केला आहे. त्यातलीच एक योजना आहे स्मार्ट सायकल सुविधेची म्हणजेच स्मार्ट बाईक शेअरींगची.

भोपाळ शहरात पन्नास स्मार्ट सायकल स्थानके (डॉकींग स्टेशन) तयार करण्यात येणार आहेत. एकूण पाचशे सायकली या स्थानकावर उपलब्ध असतील. या सायकली अत्याधुनिक तीन गिअरवाल्या असतील. स्मार्ट कार्ड, अ‍ॅप किंवा लॉग-इन पिन द्वारे भाडे भरून सायकल भाड्याने वापरायला घ्यायची आणि काम झाले की जवळच्या स्थानकावर सायकल जमा करायची. या स्थानकांवर आणि सायकलींवर जीपीएस द्वारा निगराणी ठेवण्यात येणारा आहे. वेळेची बचत, पैशाची बचत, पेट्रोल डिझेलच्या  धूरापासून प्रदूषणमुक्ती असे अनेक फायदे यामुळे होणार आहेत.