एस. टी.ची ७३ वर्षें पूर्ण !!

एस. टी.ची ७३ वर्षें पूर्ण !!

लाल डब्बा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी (स्टेट ट्रान्सपोर्ट) बस ची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली.

१९४७साली भारताला स्वातंत्र्य  मिळालं तेव्हा महाराष्ट्र हे राज्यच अस्तित्वात नव्हतं. तेव्हा सरकारी वाहतूक  ’बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन(BSRTC)’ या नावाने चालत असे. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे वेगळा महाराष्ट्र बनल्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या भागातली वाहतूक सेवा आणि BSRTC यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच MSRTC ची स्थापना करण्यात आली. 

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत. निम-आराम सेवेसाठी हिरकणी तर वातानुकूलितसाठी शिवनेरी बस उपलब्ध आहेत. शहरांतून इतकं जाणवत नसलं तरी ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही लाल डब्याला पर्याय नाही.