3D चित्रांचा मराठमोळा जादूगार : नक्की पहा २०वर्षीय सुशांतची कमाल

लिस्टिकल
3D चित्रांचा मराठमोळा जादूगार : नक्की पहा २०वर्षीय सुशांतची कमाल

चित्रकार म्हणजे खरंतर एक जादूगारच असतो. रंग, रेषा आणि आपल्या कल्पनेतून तो निर्जीव चित्रात जीव ओततो. याचं एक बेमिसाल उदाहरण आहे मुंबईचा सुशांत सुशिल राणे. अवघ्या २०वर्षे वयात आपल्या 3D चित्रकारीतील अविष्कारामुळे सुशांत भलताच लोकप्रिय बनलाय...

सुशांतने काढलेली चित्रं एकदम जिवंत वाटतात.

त्याला म्हणे बर्‍याचशा आर्ट स्कूल्समध्ये ऍडमिशनसाठी नकारघंटा मिळाली. स्वत:च्या जिद्दीने चित्रकारिता शिकण्यासाठी लागणारी चिकाटी सुशांतने दाखवली आणि आज त्याचं फळ आपण पाहात आहोत.

एक चित्र काढायला त्याला किमान  दोन ते आठ तास  लागतात. त्याच्या चित्रातले बारकाव्यांवरून त्याची मेहनत दिसून येते.

विशेष म्हणजे सुशांतने या चित्रकलेचं कोणतंही शास्त्रीय शिक्षण घेतलेलं नाही. तो सध्या आर्ट्सच्या प्रथम वर्षात शिकतोय. या फेमस 3D आर्टिस्टचे इन्स्टाग्रामवर ६८,०००पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या या अद्भुत कलेवर अनेक सेलिब्रिटी फिदा आहेत. सुशांतच्या या कल्पक कलाकारीला बोभाटा.कॉमचा सलाम...

(सर्व फोटो सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून साभार)