जाखू म्हणजे यक्ष. तर आपल्या या अंजनीसुताला तिथं यक्ष मानलं जातं. इथली कथा अशी आहे की, संजीवनी बुटी शोधायला जाताना हनुमानाने तिथं विश्रांती घेतली होती. आधीच समुद्रसपाटीपासून ८००० फुटांवर असलेल्या डोंगरावर ही १०८ फुटांची मूर्ती उभी केलीय. या मूर्तीचा शेंदरी रंग आसपासच्या हिरव्या रंगातून चटकन उठून दिसतो.
सिमल्यातल्या ’रिज’वर फिरायला गेलात आणि दक्षिणेकडे नजर टाकलीत, तर तिथेही तुम्हाला ही मूर्ती सहज दिसेल. या जाखू टेंपलला जाताना मात्र चांगलीच वाट लागते. एकतर सरळ चढणीचे आणि वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरात पोचल्यावर तिथली माकडं. तुमचा सेलफोन तर ठेवणारच नाहीत, पण एका पायात बूट घालेपर्यंत दुसर्या पायाचा बूट त्यांनी कधी पळवला हे ही तुम्हाला कळणार नाही.