तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी अचानक बिबट्या शिरला तर तुम्ही काय कराल? एकच गोंधळ उडेल ना? प्रत्येक जण आपला जीव वाचवायचा प्रयत्न करेल हे मान्य, पण म्हणून माणसाने त्या प्राण्याच्या जीवावर उठायचं?
मानव आणि प्राणी संघर्ष आपल्याला नवीन नाही. दिवसेंदिवस वाढणारी मानवी वस्ती आणि वाऱ्याच्या वेगानं उभं राहणारं मोठमोठ्या टॉवरचं जंगल यातून जंगली प्राणी शहरात किंवा गावात शिरल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर येतात. पण मग पुढे जे होतं, ते माणूस आणि प्राणीमात्र या दोघांच्याही हिताचं नसतं..











