डिसेंबरमध्ये आहेत इन्कमटॅक्स रिटर्न, GST, ऑडिट आणि हयातीचा दाखल्या देण्याच्या अंतिम मुदती!! तपशील वाचून घ्या!

लिस्टिकल
डिसेंबरमध्ये आहेत इन्कमटॅक्स रिटर्न, GST, ऑडिट आणि हयातीचा दाखल्या देण्याच्या अंतिम मुदती!! तपशील वाचून घ्या!

या वर्षी कोरोनामुळे अनेक आर्थिक संबंधित कामं पूर्ण करण्यासाठी नेहमीची मुदत वाढवण्यात आली होती. ही महत्वाची कामं ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहेत. आज आम्ही कोणकोणती कामं या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण करायची आहेत याची यादीच घेऊन आलो आहोत. ही तपासून पाहा, कारण याची मुदत पुन्हा वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नीट पाहून घ्या. अन्यथा तुम्हाला भुर्दंड बसू शकतो.

प्राप्तिकर परतावा (आयकर रिटर्न)

प्राप्तिकर परतावा (आयकर रिटर्न)

दरवर्षी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै किंवा ऑगस्टपर्यंत असते. परंतु या वर्षी ती ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर तुम्हाला रिटर्न फाइलिंगवर १०,००० रुपयांपर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो. आतापर्यंत ३ कोटी लोकांनी रिटर्न भरले आहेत आणि जसजशी अंतिम मुदत जवळ येत आहे, तसतसा त्याचा वेग वाढतो आहे. दररोज सरासरी ४ लाख लोक रिटर्न भरत आहेत. यापुढे अजून मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

वस्तू आणि सेवा कर (GST परतावा)

वस्तू आणि सेवा कर (GST परतावा)

नोंदणीकृत व्यावसायिकांना डिसेंबर महिन्यात २०-२१ या आर्थिक वर्षात वार्षिक GST रिटर्न म्हणजेच GSTR-9 ३१ डिसेंबरपर्यंत भरावे लागेल. ज्यांची उलाढाल 5 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी २० डिसेंबरपर्यंत GSTR-3B भरावे लागेल. याशिवाय १.५० कोटी ते ५ कोटींच्या दरम्यान उलाढाल असलेल्यांना ११ डिसेंबरपर्यंत फॉर्म GSTR-1 भरावा लागेल. ३१ डिसेंबरपूर्वी जीएसटीशी संबंधित अनेक वेगळे कर तारखेनुसार भरायचे आहेत.

ऑडिट अहवाल

ऑडिट अहवाल

ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न १० कोटींपेक्षा जास्त आहे अशा लोकांना आयकर रिटर्नसह ऑडिट रिपोर्ट ही द्यावा लागतो. वास्तुविशारद, अभियंता, डॉक्टर, चित्रपट अभिनेते, वकील, तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना केवळ ५० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर लेखापरीक्षण अहवाल दाखल करावा लागतो. आर्थिक वर्ष २०-२१ ची ऑडिट दाखल करण्याची अंतिम मुदत देखील ३१ डिसेंबर आहे.

जीवन प्रमाणपत्र

जीवन प्रमाणपत्र

लाखो पेन्शनधारकांना दरवर्षी बँक किंवा संबंधित कार्यालयात जीवन प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. हे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचे असले तरी यंदा ३१ डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. नाहीतर १ जानेवारीनंतर तुम्हाला पेन्शन मिळण्यास अडचणी येऊ शकतात. पुढच्या काळात ज्यांना, बँका किंवा कार्यालयांच्या फेऱ्या मारणे अवघड जाते त्यांना व्हर्च्युअल मोडमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय होऊ शकते. सध्या त्याच्यावर काम चालू आहे.

जवळपास १२ दिवस बँका बंद

जवळपास १२ दिवस बँका बंद

अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. डिसेंबरमध्ये काही राज्यांत जवळपास १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ७ दिवस बँकाना सुट्ट्या आहेत. तसेच १६,१७ डिसेंबर रोजी खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे तारखा पाहून जा आणि कामे वेळेत पूर्ण करा.

शीतल दरंदळे