TCS फ्री ऑनलाईन कोर्स: संभाषण कौशल्य, सॉफ्टस्किल्स आणि करिअर गायडन्स सोबत आहे आणखी बरंच काही!!

लिस्टिकल
TCS फ्री ऑनलाईन कोर्स: संभाषण कौशल्य, सॉफ्टस्किल्स आणि करिअर गायडन्स सोबत आहे आणखी बरंच काही!!

नोकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत आहे. अनेकांना शिक्षण पूर्ण होऊन पण योग्य नोकरी मिळत नाही. त्यात कोरोनामुळे या समस्येत मोठीच भर पडली आहे. अशावेळी बदलत्या नोकऱ्यांच्या स्वरूपाचा विचार करून अनेक ऑनलाइन कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. पण यातले काही कोर्सेसची फी जास्त असते. पण ज्यांना नव्या संधींचा शोध आहे, अशा तरुणांसाठी टीसीएस ही टाटांची आयटी कंपनी एक फ्री ऑनलाइन कोर्स घेऊन आली आहे.

'TCS ion career edge' असे या कोर्सचे नाव आहे. यात कोर्समध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता, संभाषण कौशल्य, व्यवसाय भान अशा गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. या कोर्सचा कालावधी १५ दिवस आहे. दर आठवड्याला ७-१० तास कोर्समध्ये उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे.

या कोर्ससाठी अशी कुठली निश्चित पात्रता ठेवण्यात आलेली नाही. पदवी घेतलेले, पदवीला असलेले, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले कुणीही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. या कोर्समध्ये १४ मॉड्युल्स असतील. यात वागणूक आणि संभाषण कौशल्य, अकाउंटमधील फाउंडेशन स्किल्स, आयटी आणि आर्टिफिशीयल इंटेलिजन्स यांचा समावेश आहे.

कोर्स करणारा विद्यार्थी प्रत्येक मॉड्युल १-२ तासात पूर्ण करू शकणार आहे. प्रत्येक मॉड्युलमध्ये टीसीएसमधील तज्ञांनी तयार केलेले व्हिडिओ, प्रेझेंटेशन, रिडींग मटेरियल, रेकॉर्डेड वेबिनार्स असतील. हा कोर्स कुठल्याही डिव्हाईसवर कुठल्याही वेळी करता येणार आहे.

कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट मिळेल. तसेच त्यांना एका मॉडरेटेड डिजिटल डिस्कशनचा ऍक्सेस असेल, ज्या माध्यमातून ते आपल्या अडचणी सोडवू शकतील. या कोर्समध्ये मुख्य भर हा संकल्पना समजवण्यावर असणार आहे.

या कोर्समधील १४ मॉड्युल्स खालीलप्रमाणे आहेत.

या कोर्समधील १४ मॉड्युल्स खालीलप्रमाणे आहेत.

१) लोकांना प्रभावित करण्यासाठी शाब्दिक आणि अशाब्दिक संभाषण कौशल्य वाढवणे.

२) प्रेझेंटेशन प्रभावी कसे करता येईल यावर प्रशिक्षण.

३) कामाच्या ठिकाणी लागणारे सॉफ्टस्किल्स कसे डेव्हलप करता येतील याबद्दल प्रशिक्षण.

४) टीसीएसमधील तज्ञांकडून करियरबद्दल महत्वाचे मार्गदर्शन.

५) ग्रुप डिस्कशन प्रभावीपणे कसे करता येईल याची शिकवण.

६) कॉर्पोरेट मुलाखतींना कसे सामोरे जावे याची माहिती.

७) कॉर्पोरेट जगतात सांभाळले जाणारे शिष्टाचार.

८) प्रभावी इमेल कसे तयार करता येतील याबद्दल माहिती.

९) कॉर्पोरेट कामाच्या ठिकाणी टेलिफोन काम असेल तर ते कशा पद्धतीने करावे याची माहिती.

१०) अकाउंटिंगबद्दल संकल्पना समजावणे आणि इतर माहिती.

११) चांगला रेझ्युमे कसा तयार करता येईल याचे प्रशिक्षण

१२) आयटी क्षेत्रातील बेसिक स्किल्स शिकवले जातील.

१३) आर्टिफिशीयल इंटेलिजन्स बद्दल माहिती यात आजवरचा एआयचा प्रवास.

१४) आर्टिफिशीयल इंटेलिजन्सबद्दल महत्वपूर्ण माहिती.

हा कोर्स जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://learning.tcsionhub.in/courses/career-edge-young-professional/

पाहा, नवीन काहीतरी शिकणे बरेचदा फायद्याचे ठरते.