बाल दिनाच्या निमित्ताने तेलंगणा पोलिसांनी लहान मुलांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे. तेलंगणाच्या ‘राचकोंडा मेडिपल्ली’ पोलीस ठाण्यात लहानमुलांसाठी एक स्पेशल जागा बनवण्यात आली आहे. या जागेला “child-friendly corners” नाव देण्यात आलंय.
गेल्या काही वर्षात लहान वयात असतानाच काही व्यसनं लागणे, रागाच्या भरात हातून हिंसा घडून येणे, समाजातील काही व्यक्तींनी मुलांचा लैंगिक छळ करणे हे प्रकार जास्तीतजास्त उघडकीस येत आहे. मुले अशा घटनांनी दबून जातात, निराश होतात, त्यांना काय करावे काहीच सुचत नाही त्यामुळे समाजकंटकांचे आणखीनच फावते. अशा सर्व प्रकरणांना चाईल्ड कॉर्नरमुळे वाचा फुटणार आहे.



