टोकिओ आहे जगातलं अव्वल नंबरचं प्रामाणिक शहर!!!

टोकिओ आहे जगातलं अव्वल नंबरचं प्रामाणिक शहर!!!

प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट आपल्याला शाळेत शिकवली जाते. सचोटी, प्रामाणिकपपणा याचे धडे आपण सर्वच शाळेत शिकलो होतो आणि शाळेतच विसरूनही गेलो होतो. जपानी नागरिक मात्र हे सर्व धडे प्रत्यक्ष जीवनात अमलात आणतात, असं दिसतंय. आणि कदाचित यामुळंच टोकिओ हे जगातलं अव्वल नंबरचं प्रामाणिक शहर आहे.

याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे गेले वर्षभर रस्त्यात, गाडीत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सापडलेले गहाळ झालेले तब्बल ३ कोटी डॉलर (२०० कोटी रुपये) रोख रक्कम जागरूक जपानी नागरिकांनी पोलिसांकडे जमा केली आहे. यापैकी जवळजवळ ७५% रक्कम मूळ मालकांकडे सुपूर्तही झाली आहे.

एका परीनं हा प्रामाणिकपणाचा कळसच म्हणायला हवा. जपानमधील ‘लॉस्ट अँड फाउंड’ च्या कायद्यानुसार नागरिकांना सचोटीचं बक्षीसही मिळतं. अशा जमा केलेल्या रकमेच्या ५ ते २०% टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते आणि जमा केलेल्या रकमेवर कोणी दावा न सांगितल्यास १००% रक्कम नागरिकांना बक्षीस म्हणून दिली जाते.

आहे ना भारी!!!