जगातले सायकल चालवणारे १० श्रीमंत देश !!!

जगातले सायकल चालवणारे १० श्रीमंत देश !!!

हल्ली आपल्याकडे नवीन फॅड आलंय राव. एखादी ‘बायिक’ नाही तर निदान ‘स्कुटी’ तरी हवी हे जवळ जवळ प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. एक काळ असा होता जेव्हा हीच तरुण मंडळी लहानपणी सायकल हवी म्हणून आटापिटा करत. वाढती वाहने आणि त्याचबरोबर वाढत जाणारे पेट्रोल डीझेलचे भाव हे गणित काही केल्या जुळत नाहीये.

एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण वाढत असताना त्याकडे कानाडोळा करत आपण दुचाकी चारचाकीच्या फॅडला बळी पडतोय. मात्र असे काही देश आहेत जिथली माणसे अगदी उच्चवर्गी श्रीमंत असून आजही प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. त्यांनी मनात आणलं तर अगदी लक्झरी कार घेणं त्यांना काही महाग पडणार नाही पण सायकलीचं महत्व जाणून त्यांनी ही पद्धत त्यांनी जपली आहे.

चीन मध्ये सायकलीचा वापर होतो हे आपल्याला ठाऊक असेल पण त्याशिवाय इतर कोणते देश आहेत हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

चला तर सायकलीवरून जाऊया जगातील अश्या १० देशांच्या सफरीवर !

 

१. बेल्जियम.

bikes-in-belgiumस्रोत

लोक : 10,827,519

सायकली : 5,200,000

सायकलस्वार : 48%

राव सायकलिंग हा बेल्जियमचा राष्ट्रीय खेळ आहे. बेल्जियमचे लोक्स सायकलच्या बाबतीत खूप गंभीर आहेत. आपल्याकडे जसे ‘कार’वर, ‘बायिक’ वर प्रेम करणारी माणसं आहेत तशी तिथे सायकल वर प्रेम करणारी माणसं भेटतील. आश्चर्य म्हणजे सायकल चालवताना ही माणसं आवर्जून हेल्मेट घालतात. भारतासाठी हे आश्चर्यचं आहे म्हणा.

 

२. स्वित्झर्लंड.

bikes-in-switzerlandस्रोत

लोक: 7,782, 9 00

सायकली : 3,800,000

सायकलस्वार :  48.8%

सायकलिंग करणारा देश म्हणून स्वित्झर्लंड ओळखला जातो. इथे ५ टक्के लोक सायकलचा रोजच्या जीवनात वापर करतात. कामानिमित्त बाहेर पडताना प्रवासाचं प्रमुख साधन म्हणून सायकलीकडे बघितलं जातं. स्वित्झर्लंड मध्ये ‘बायिक टू वर्क’ हे कॅम्पेन तिथल्या चाकरमान्यांसाठी राबवलं जातं.

 

३. जपान

bike-in-japanस्रोत
लोक: 127,370,000

सायकली: 72,540,000

सायकलस्वार : 56.9%

जपान मधले १५ टक्के माणसं रोजच्या कामासाठी सायकलचा वापर करतात. एका अभ्यासानुसार जपान मध्ये जवळजवळ १ करोड सायकल वर्षभरात विकल्या गेल्याचं म्हटलं जातंय. आरोग्याच्या दृष्टीने आणि ट्रॅफिक जाम पासून वाचण्यासाठी तिथली माणसं सायकलच्या वापराकडे अधिकाधिक वळत आहेत. सायकलचा वापर एवढा वाढलेला आहे की काहीवेळा सायकल लॉक न करता माणसं निघून जातात.

 

४. फिनलँड

bike-in-finlandस्रोत
लोक : 5,380,200

सायकली : 3,250,000

सायकलस्वार : 60.4%

फिनलँड मध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सार्वजन सायकलच्या प्रेमात आहेत. फिनलँडच्या उन्हाळ्यात रस्तोरस्ती तुम्हाला सायकल पाहायला मिळतील याशिवाय दिवसभराच्या प्रवासासाठी ९ टक्के लोक सायकलचा वापर करतात.

 

५. नॉर्वे

broken-bikeस्रोत

लोक: 4, 9 43,000

सायकली: 3,000,000

सायकलस्वार: 60.7%

लाखो सायकल नॉर्वेत वापरल्या जातात. सायकलचा वापर आणि मागणी पाहता नॉर्वेत सायकल चोर फार आहेत. अनुभवी चो काही सेकंदात सायकल पळवून नेऊ शकतो. अश्या पळवून नेलेल्या सायकलची किंमत बाजार खूप जास्त असते. युरोप आणि रशियात या सायकली विकल्या जातात.

 

६. स्वीडन

bikes-in-swedenस्रोत
लोक: 9,418,732

सायकली: 6,000,000

सायकलस्वार: 63.7%

कुटुंबातील सदस्यांच्या आवडी निवडी नुसार इथे सायकल पाहायला मिळतील. खास बात म्हणजे इथल्या माणसांना घरातल्या टीव्ही पेक्षा सायकल महत्वाची आहे. इथे ९% लोक रोज सायकलीचा वापर करतात.

 

७. जर्मनी

bike-in-germanyस्रोत

लोक : 81,802,000

सायकली : 62,00,000

सायकलस्वार : 75.8%

जर्मनीत अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जिने सायकल चालवली नसेल. जर्मनीत लहानपणीच सायकलची आणि मुलांची ओळख करून दिली जाते. स्वीडन प्रमाणे इथेही ९% लोक सायकलचा वापर दैनंदिन जीवनात करतात.

 

 

८. डेन्मार्क

bike-in-denmarkस्रोत

लोक: 5,560,628

सायकली: 4,500,000

सायकलस्वार: ~ 80.1%

डेन्मार्क मधली तब्बल १८ टक्के लोकसंख्या ही सायकल चालवते मंडळी. डेन्मार्क मधल्या प्रवासासाठी आरोग्यदायी, स्वस्थ आणि मस्त साधन म्हणून सायकलकडे बघितलं जातं. इथे पर्यटकांना फिरण्यासाठी सायकली फ्री दिल्या जातात आणि त्याचा मोठा फायदा म्हणजे नयनरम्य दृश्य अगदी जवळून पाहता येतं.

 

९. नेदरलँड

bikes-in-amsterdamस्रोत


लोक : 16,652,800

सायकली : 16,500,000

सायकलस्वार : 99.1%

सायकलीस्टचा देश म्हणून नेदरलँड ओळखलं जातं. नेदरलँड मध्ये साधारण एक माणूस दररोज २.५ अंतर सायकल चालवतो. लाखो सायकल दरवर्षी इथे विकल्या जातात आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इथला पंतप्रधान देखील सायकल चालवतो. नरेंद्र मोदींनी जेव्हा नेदरलँडला भेट दिली तेव्हा त्यांना भेट म्हणून सायकल देण्यात आली होती.

PM Narendra Modi in Netherlands, PM Narendra Modi, PM Narendra Modi three nation tour, PM Mark Rutteस्रोत

नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅम ही जगभरात सायकल फ्रेंडली शहर म्हणून ओळखलं जातं. इथली माणसं सायकलवर अधिक पैसा खर्च करताना दिसतात. पण इथेही सायकल चोरांचा प्रश्न आहेच कारण सायकलला मागणी भरपूर आहे.

 

१०. चीन.

bikes-in-chinaस्रोत

लोक: 1,342,700,000

सायकल : 500,000,000

सायकलस्वार : 37.2%

आपल्या सर्वांचं परिचयाचं सायकल फ्रेंडली राष्ट्र म्हणजे चीन. कामाला जाताना इथली माणसं सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ही संख्या शांघाय मध्ये जास्त आहे. शांघाय मधली ६० टक्के लोकसंख्या सायकल चालवते.

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख