उन्हाळ्यात उष्णता वाढते त्यामुळे शरीराचे तापमान देखील वाढते. अशावेळी शरीराला थंड ठेवण्याची आवश्यकता भासते. अश्या बदललेल्या हवामानासाठी तशाच प्रकारचे पोषक खाद्यपदार्थही खाल्ले पाहिजेत. या यादीतले १० सर्वोत्कृष्ट थंड पदार्थ तुम्हाला ह्या उन्हाळ्यात उत्तम आरोग्यासाठी नक्कीच मदत करतील.
उन्हाळ्यासाठी ९ सर्वोत्कृष्ट थंड पदार्थ


दही
दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दह्यामध्ये उपयोगी जीवाणू असतात, ते शरीराला लाभदायक असतात. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात दुधापेक्षा दही खाणे अधिक फायद्याचे असते.

नारळाचे पाणी
शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, उन्हाळ्यात दिवसांत नारळाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक आहे. उष्मा आणि तीव्र उन्हामुळे शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. नारळाच्या पाण्यात मीठ, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते. एका नारळात 750 मिलिलीटर पाणी असते.

कलिंगड
कलिंगड उन्हाच्या काहिलीपासून गारवा देतेच तसेच याच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. कलिंगड हे एक आरोग्यदायी फळ असून याचे अनेक फायदे आहेत.

काकडी
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होऊ शकतो. काकडी मध्ये पाणी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी ती आरोग्यदायी असते.

पुदिना
औषधी गुण, पचन क्रिया सुरळीत करण्याचे गुणधर्म आणि शरीरासाठी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात पुदिना शरीरासाठी लाभदायक ठरतो. पुदिना ही स्वस्त व सहजपणे मिळणारी वनस्पती असते जे आपण दह्यात घालून सेवन करू शकता अथवा पुदिन्याचे रायते अथवा चटणी किंवा Dips म्हणून वापरू शकता.

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या खरं तर वर्षभर खाव्या, पण भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अतिशय चांगल्या. कारण भाज्यांमध्ये भरपूर प्रमाण पाण्याचे प्रमाण आढळते. भाज्यांना जास्त शिजवत राहू नये. कारण भाज्या अति शिजवल्यास पाण्याचे प्रमाण उडून जाते.

कांदे
कांद्यामध्ये अफाट थंडावा देणारे गुणधर्म आढळतात. कांद्याचा समावेश रस्सा, Dips, रायते, कोशिंबीर व चटणीमध्ये अवश्य करावा. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

लिंबूपाणी
दिवसभरात एखादा ग्लास सरबत घेतल्याने dehydration टाळता येते व शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळतो येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते.

कोकम सरबत
दिवसभरात एखादा ग्लास कोकम सरबत घेतल्याने Dehydration टाळता येते व शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव टाळतो येतो. याशिवाय भूकही वाढण्यास मदत होते व रक्ताचे शुद्धीकरणही होते. कोकम सरबत उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतर किंवा दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही, तसेच पित्ताचे शमन पण होते.