२०२१मधले काही विचित्र, रंजक आणि सुरस फोटो!! प्रत्येकाची कहाणीही तितकीच रोचक आहे!!

लिस्टिकल
२०२१मधले काही विचित्र, रंजक आणि सुरस फोटो!! प्रत्येकाची कहाणीही तितकीच रोचक आहे!!

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वर्षभरात घडलेल्या विविध गोष्टींचा ताळेबंद वर्ष सरत असताना मांडला जाईल. आम्ही मात्र काही अशा गोष्टी घेऊन येणार आहोत, ज्या सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. याच साखळीतील एक म्हणजे वर्षभरात काढण्यात आलेले काही चित्रविचित्र फोटो. हे बघून तुम्हाला हसूही येईल आणि कुतूहल देखील वाटेल.

१) क्रिमिया येथील एका प्राणी संग्रहालयातील हा फोटो आहे. छोट्या गाड्यांच्या मॉडेल्समधून एक लांब हातांचे वानर फिरत असल्याचा हा फ़ोटो आहे. बघताक्षणी एखाद्या हॉलीवूड सिनेमाचा हा प्रसंग वाटून जातो.

२) हा फोटो कॅलिफोर्निया येथील आहे. रोज बॉल स्टेडियम बाहेर ज्यूरासिक क्वेस्ट ड्राइव्हच्या माध्यमातून लोकांना ज्युरासिक पार्कच्या काही आठवणी अनुभवता आल्या होत्या. समांथा बेली यांनी आपला एक सहकारी रॅप्टर डायनासोरच्या वेशात असलेला असताना त्यांच्या सोबत सेल्फी घेतला.

३) पोप फ्रान्सिस यांना भेटायला आलेला स्पायडरमॅन असेच हा फोटो बघून कुणीही म्हणेल. व्हॅटिकन सिटीमध्ये स्पायडरमॅनचा वेष घेऊन आलेल्या व्यक्तीसोबत पोप हस्तांदोलन करतानाचा हा फोटो आहे.

४) हा फोटो स्वित्झर्लंडमधला आहे. उन्हाळी प्रवास संपल्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एका गायीचे स्थलांतर करण्यात आले, त्याचा हा फोटो आहे. बघून सूर्यवंशम सिनेमामधलं एअरलिफ्ट आठवलं असेल.

५) ब्रिटनमध्ये कोविड स्वयंसेवकाला विचित्र मास्क घालून टाटा करताना एक गृहस्थ दिसत आहेत.

६) आईसलंडमधल्या रेजेन्स(Reykjanes) पेनेन्सुला द्वीपकल्पावर ज्वालामुखीजवळ एक व्यक्ती हॉट डॉग शिजवत असल्याचा हा फोटो तुमचे डोळे विस्फारू शकतो.

७) रशियातल्या झेरझिंक्स(Dzerzhinsk) येथील एका केमिकल प्लांटजवळ काही कुत्र्यांच्या अंगावरचे केस निळे झाल्याचे आढळले होते. नंतर या कुत्र्यांना यामुळे काही त्रास झाला का हे बघण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले होते. तिथे एका निळ्या रंगाचा झालेला हा कुत्रा कॅमेऱ्यात कैद झाला होता.

८) एलेक्सांडर कुंदले आणि व्हिक्टोरिया पुस्तोवीतोवा हे युक्रेनमधील दाम्पत्य सततच्या ब्रेकअपला कंटाळले होते. यावर त्यांनी शोधलेला उपाय भन्नाट आहे. त्यांनी चक्क एकमेकांना बेड्या ठोकल्या होत्या. ते सतत तीन महिने असे बेडीत अडकून राहिले आणि सोशल मिडियावर या काळातले अनुभव शेअर करत होते. हातात बेड्या बांधून नाश्ता करत असताना त्यांचा फोटो वायरल झाला होता.

९) हा फोटो आहे इटलीमधील काल्डस इथला. आपल्या मेंढपाळ बाबाला मदत करण्यासाठी जंगलात असताना तिथेच टेबल आणि लॅपटॉप घेऊन ऑनलाइन लेक्चर करणारी मुलगी या फ़ोटोत दिसत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कहाण्या कधी संपणार नाहीत!!

१०) जर्मनी येथे दाढीमिशांची एक स्पर्धा होती. तेथे ऑस्ट्रियाहुन आलेला एक स्पर्धक मात्र जगभरातील लोकांचे लक्ष वेधून गेला. नोरबर्ट डोफ असे त्याचे नाव होते.

उदय पाटील