हा ट्रॅफिक हवालदार चिरीमिरी घेत नाही - इंदूरमध्ये रोबोट ट्रॅफिक हवालदार !

हा ट्रॅफिक हवालदार चिरीमिरी घेत नाही - इंदूरमध्ये रोबोट ट्रॅफिक हवालदार !

इंदूरमधला एमआर -९ या नावानी ओळखला जाणार्‍या नाक्यावर सिग्नल नसल्यामुळं नेहमी ट्रॅफिकचा गोंधळ चालू असतो. पण या रविवारी वाहनचालकांना एक वेगळाच अनुभव आला. ट्रॅफिक हवालदारच्या जागी चक्क एक रोबोट (यंत्रमानव)  वाहतूक नियंत्रित करत होता.

इंदूरमधल्या एका इंजिनियरींग कॉलेजने अडीच वर्षांच्या मेहेनतीनंतर बनवलेला हा रोबोट गेल्या रविवारीपासून वाह्तूक नियंत्रित करतो आहे. चौदा फूट उंचीचा हा रोबोट एखाद्या माणवासारखा मागे पुढे नजर ठेवत हे काम करतो आहे.या रोबोटमध्ये लाल -हिरवे दिवे तर आहेतच, पण सोबत काही कॅमेरे पण आहेत. या कॅमेरामध्ये रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीम आहे,ज्यामुळे सिग्नल तोडणार्‍या वाहनांची आपोआप नोंद केली जाईल. हा रोबोट लावल्यावर आता मानवी हवालदाराची गरज संपली आहे.  पण सिग्नल तोडल्यावर आता चिरीमिरी देऊन  सुटका होणे पण शक्य नाही.